धर्माबाद| बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि. 17 फेब्रुवारी 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.28/02/2022 ही आहे. तरी पालकांनी ऑनलाईन अर्ज जास्ती जास्त संख्येने करावेत असे आवाहन ऑल इंडिया तंझीम ए इंसाफ चे शहर अध्यक्ष पत्रकार म.मुबशिर यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी सन 2022-2023 करीता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्याला शाळा मिळाल्यास पालकांचे वार्षिक उत्पन्न दाखला, पालकाचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, पालकाचे जात प्रमाणपत्र, पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
तसेच शासनाने शिक्षणापासून मुले वंचित राहू नये गरीब मुलांनादेखील अद्यावत व गुणवत्तापूर्वक इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे. या मोफत प्रवेशा पोटी फीचा परतावा शासन करणार आहे. अशा महत्वपूर्ण व आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.तेव्हा पालकांनी आपला वेळ न दडविता आपल्या पाल्यांचा ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात यावा असे आव्हान ऑल इंडिया तंझीम ए इंसाफ चे शहर अध्यक्ष पत्रकार म.मुबशिर यांनी केले आहे.