अर्धापूर, निळकंठ मदने| शिवजयंती महोत्सव गावागावात साजरा करतांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पोलिस ठाण्यात अर्ज करुन नियमानुसार शिवजयंती शांततेत पार पाडाव्यात असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले.
अर्धापूर पोलिस ठाण्यात शिवजयंती निमित्त तालुक्यातील पोलिस पाटील, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष,शांतता कमेटीचे सदस्य यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,जिल्हा शांतता कमेटीचे निळकंठ मदने,पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अशोक जाधव म्हणाले कि, सर्व कार्यक्रमाचे सरकारने शासकीय निकष ठरवून दिलेले असल्याने त्याचे पालन करुन सर्व कार्यक्रम त्याप्रमाणे करायचे आहेत.
त्यामुळे आपापले कार्यक्रम आनंदात साजरे करता येतील त्यासाठी सर्वांनी शासकीय निकष समजावून घेणे ही काळाची गरज आहे,सबंधीतांनी हे नियम सहकार्यांना समजावून सांगून प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो काॅ भिमराव राठोड यांनी तर आभार कल्याण पांडे यांनी मानले.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचीन येवले,उपप्रमुख सदाशिव इंगळे,पो पा उल्हास कल्याणकर, शंकरराव टेकाळे,राजाराम पवार, नवनाथ कपाटे,पिंन्टू पाटील,बाळू कल्याणकर,शंकर हापगुंडे,रवी शिंदे, नामदेव दुधाटे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.