नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नांदेड शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या अटकेचा निषेध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
भाजप सरकारने राज्यातील मंत्र्यांच्याविरोधात सूडाचे राजकारण सुरू केले आहे. अशा ध्येय धोरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या पायाखालची जमीन सरकली होती. राज्य सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट करून ईडीसारख्या एजन्सीचा गैरवापर केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जात आहे.
दि. 23 फेब्रुवारी रोजी मंत्री नवाब मलीक यांना ईडीकडून अटक झाली. या अटकेचा राज्यभर निषेध नोंदविला जात आहे. नांदेड जिल्हा व शहर ग्रामीण, अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांनी केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग मोहम्मद खान पठाण, डॉ. मुजाहिद खान, रऊफ जमीनदार, प्रांजली रावणगावकर, सिंधुताई देशमुख, मोहम्मदी पटेल, मजहर सर, मोहसीन खान, डॉ. परशुराम वरपडे, उत्तमराव आलेगावकर, विक्रम देशमुख, युनूस खान, शफी उर रहेमान, श्रीधर नागापूरकर, मनबीरसिंघ ग्रंथी, गगनदिपसिंघ रामगडीया, डी.बी. जांभरूणकर, एकनाथ वाघमारे, सय्यद मौला मोहम्मद दानिश, बालाजी शेळके, रमेश गांजापूरकर, तातेराव आलेगावकर, प्रा. प्रेमकुमार कौशल्ये, मीना पेठवडजकर, हिदायत खान पठाण, प्रकाश मांजरमकर, चंपतराव हाताळगे आदींची उपस्थिती होती.