गिरजाबाई कहाळेकर यांचे निधन -NNL


नांदेड|
कहाळा (बु.) ता. नायगांव येथील जेष्ठ महिला नागरिक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूरच्या माजी संचालिका व कहाळा बु. सेवा सहकारी सोसायटीच्या माजी सदस्या गिरजाबाई शंकरराव कहाळेकर यांचे दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्यावर कहाळा बु. येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात्त ३ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधवराव कहाळेकर यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी