पोखरभोसी येथे ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण,श्रीमद् भागवत कथा -NNL

ज्ञानयज्ञ आणि लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन


उस्माननगर|
येथून जवळच असलेल्या पोखरभोसी (ता.लोहा) येथे दि.२५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान श्री. गुरुवर्य वैकुंवासी मामासाहेब मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री गाथा पारायण, श्रीमद् भागवत कथा व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे(वर्ष ४१वे )आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहतील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दु.१२ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायं.५ ते ६ हरिपाठ , रात्री ९ ते हरिकिर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह.भ.प.यादव महाराज डांगे,ह.भ.प.प्रकाश महाराज डांगे, ह.भ.प.दत्ता सोपान ताटे, नित्य हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात  किर्तनकार दि.२५ फेब्रुवारी शुक्रवारी रात्री श्री.ह.भ.प.रंगनाथ महाराज (पोखरभोसीकर) ,दि.२६ रोजी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरुजी( सोनखेड,मानखेड),दि.२७ रोजी श्री.ह.भ.प.ज्ञानोबा माऊली मुढेकर,दि.२८ रोजी सोमवारी श्री.ह.भ.प.ज्ञानोबा माऊली (आरबुजवाडीकर), दि.१मार्चरोजी मंगळवारी हे.भ.प.किशोरमहाराज सुर्यवंशी (लातुरकर,) दि.२ मार्च रोजी बुधवारी ह.भ.प.सतिष महाराज पंढरपुरकर ( पांडुरंग पुजारी) दि.३ मार्च रोजी गुरुवारी यांचे दुपारी १२ वाजता लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम निष्काम सेवा मंडळातर्फे होईल. ह.भ.प.विजयानंद महाराज सुप्पेकर दि.४ मार्च रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन ह.भ.प.ज्ञानोबा माऊली मुढेकर यांचे होईल.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सप्ताहात दररोज दुपारी भागवताचार्य श्री.ह.भ.प.माधव महाराज केंद्रे  माळाकोळीकर हे भागवत कथा सांगणार असून सहायक गायक उध्दवराव महाराज पिंपळगावकर तर तबला साथ सुर्यकांत महाराज गंगनबीडकर, नागोराव महाराज जाधव चौंडीकर हे साथ देणार आहेत. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी  उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन पोखरभोसी येथील गावकरी  मंडळींनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी