पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती
नविन नांदेड। नांदेड शहराचा विकास वेगाने होत असून ते एक प्रमुख शैक्षणिक केंद्र बनत आहे. त्याच प्रमाणे रुग्णांसाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयाच्या विकास कामासा'ठी हडकोकडून कर्ज मिळणार असून 400 कोटी रुपयांच्या कर्जाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते विष्णूपुरी भागात विविध विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा २८ फेब्रुवारी रोजी पार पडला, यावेळी पालकमंत्री ना.चव्हाण हे पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते. पुढे म्हणाले की, नांदेड शहर हे प्रमुख शैक्षणिक केंद्र बनत आहे. तसेच श्री गुरु गोिंवदसिंघजी जिल्हा रुग्णालयात गरीब व सामान्य रुग्णांना वेळीच उपचार मिळावे, यासाठी आवश्यकती यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या विकासकामासाठी हडको कडून कर्ज मिळणार असून चारशे कोटी रुपयांच्या कर्जास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकार हे केवळ घोषणा करत नसून प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात करीत आहे. त्याप्रमाणे नांदेड ते जालना समृध्दी द्रुतगती मार्गाचे काम वेगाने सुरु असून देगलूर नाका ते सुतगीरणी मार्गावर मोठा पुल उभारण्यात येणार आहे.
नांदेडचा विकास लक्षात घेता मरा'वाड्यात बुलेट ट्रेन सुरु करावी, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली असून त्यास मंजूरी द्यावी, अशी मागणी ना.चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान नांदेड-लातूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासन ५० टक्के वाटा उचलण्यास तयार असून त्याचे श्रेय कोणीही घेतले तरी अडचण नाही, असे ते शेवटी म्हणाले. या परिषदेस आ.मोहन हंबर्डे,आ.अमर राजुरकर,संचालक, डॉ.दिपक महसैकर, पक्षप्रवकता संतोष पांडागळे व बांधकाम विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.