मराठी भाषा आणि संस्कृती कधीच मृत होणार नाही - डॉ. भारत कचरे -NNL

नवीन नांदेड। मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी, यासाठी मराठी माणसांनी पुढे आले पाहिजे. प्राचीन व  वैभवशाली अशी मराठी भाषा आणि संस्कृती कधी ही मृत होणार नाही, असे प्रतिपादन के.आर.एम.महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.डॉ.भारत कचरे यांनी केले. 

श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित 'जागतिक मराठी भाषा गौरव दिन' आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रम   प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार होते. डॉ. कचरे  म्हणाले , आज जगात सहा हजाराहून अधिक भाषा बोलल्या जातात. त्यातील काही भाषांना राजाश्रय मिळाला. मराठी ही दोन राज्यांची राजभाषा आहे.भाषेचे संवर्धन हे संस्कृतीचे संवर्धन असते म्हणून संस्कृती टिकवून समाजाच्या उत्कर्षासाठी भाषा संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. 
   
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी अनेक संदर्भ देत मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषेचा   सर्व क्षेत्रात वापर वृद्धिंगत केला पाहिजे. मातृभाषेच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे  असे  सांगितले. या कार्यक्रमासाठी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे सह.अधिष्ठाता प्रो. डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ.जी. वेणुगोपाल,डॉ. व्यंकटेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.साहेबराव शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.डॉ.ललिता आय्या यांनी तर  डॉ.शोभा वाळूककर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील डॉ.व्ही.आर.राठोड, डॉ.पंडित चव्हाण,प्रा. डॉ. नागेश कांबळे, डॉ.एस.जी.मोरे,डॉ. एम.के.झरे, डॉ. ए.जी.गच्चे डॉ.व्ही.व्ही.मोरे, डॉ.आर.एम.कागणे, डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ.उत्तम कानवटे,डॉ. डी.एस.पालिमकर, प्रा.संतोष शिंदे ,डॉ. एस.बी.गिरे, कार्यालयिन अधिक्षक श्री. आर.डी.राठोड यांनी परिश्रम घतले.  या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी