नांदेड। टाकळगाव ता.लोहा येथे रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सरपंच भिमराव लामदाडे ,शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष संजय जाधव,उपाध्यक्ष प्रभाकरराव थेटे ,सचिव कैलास लामदाडे यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली,या रक्तदान शिबिरात एकुण 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले, गोविंद मोरे, शिवाजी लामदाडे, निर्गुण मोरे ,आंनदा शिंदे,अवधुत थेटे, शिवम लामदाडे,प्रकाश लामदाडे,नागेश मोरे,शिवाजीराव मोरे, अवधुत क्षीरसागर,निराकार मोरे, गजानन मोरे, माधव टरके, मारोती लामदाडे, प्रभाकर थेटे, संजय जाधव, ऋषिकेश डाके,श्रीकांत तेलंग हे शिबिरात रक्तदान केले तर यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव सोहळा समितीतील सर्व सदस्य ,डाॅ.पुजा शरद, डाॅ. नागरगोजे आवचार,बाबुराव गायकवाड,सय्यद आजम, वाळिव लामदाडे यांनी सहकार्य केले.