नांदेड| नांदेड पोलीस दलाची वार्षीक तपासणी कार्यक्रम चालु आहे. त्या अनुषंगाने दिनांक 21.02.2022 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रतिक्षालयाचे उदघाटन निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते झाले.
येथील पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रतिक्षालयाचे उदघाटन पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रतिक्षालयामध्ये येणारे अभ्यागतांना थांबण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात प्रतिक्षालय तयार करण्यात आले असुन त्या मध्ये सायबर गुन्हयाचे नवनविन पध्दती व त्यावरील उपाय या विषयीचे जनजागृतीचे विवीध प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमोद शेवाळे,पोलीस अधिक्षक नांदेड, अर्चना पाटील, पोलीस उप-अधिक्षक, (मुख्यालय), द्वारकादास चिखलीकर,पोनि स्थागुशा नितीन काशीकर, पोनि सायबर सेल, भगवान धबडग, पोनि नियंत्रण कक्ष, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी. सायबर सेलचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते. पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांनी सायबर सेलचे कामगीरी बाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे. या बाबत सायबर सेलेचे पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, यांनी असे सांगीतले की, हे सदरचे बॅनर ज्या ज्या व्यक्ती वाचतील ते निश्चितच सायबर फसवणुक पासुन सुरक्षित राहातील असा आम्हाला विश्वास आहे.