बेलसर येथे अंत्यसंस्कार
अर्धापूर| तालुक्यातील बेलसर येथील कृऊबासचे संचालक तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक, सधन शेतकरी आनंदराव पाटील क्षिरसागर यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. दि. २३ फेब्रुवारी बुधवारी दुपारी २.०० वाजता बेलसर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वर्गीय आनंदराव पाटील क्षिरसागर हे काॅग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी तालुका रोजगार हमी योजनेचे तालुकाध्यक्ष म्हणुन काम केले. तर बेलसर येथील सरपंच पदी सलग पंधरा वर्षे काम केले आहे.
ते काॅग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून अर्धापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सरपंच म्हणून परिचित आहेत. \त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर दि. २३ फेब्रुवारी बुधवारी दुपारी २.०० वाजता बेलसर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.