सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय फक्त सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापुरता लागू असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाहीत अशी तरतूद आहे. तथापि, कोविड-१९ चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या वर्षी शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन होऊ शकलेले नव्हते.
सन २०२०-२१ मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा आयोजित न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळू शकलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन २०२१-२२ या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.