नांदेड| कोरोना काळाने निर्माण केलेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक उर्जा निर्माण करण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या व्यापक उपक्रमांतर्गत शेवडी बाजीराव या केंद्राची शिक्षण परिषद केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थखनी केंद्रप्रमुख नागोराव जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुनेगाव बीटाच्या शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती सरस्वती अंबलवाडी मॅडम, सुनेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री इकबाल शेख सर ,महेश विद्यालय शेवडी चे मुख्याध्यापक मरशिवणे, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे ,विशेष तज्ञ चौडेकर, दगडगाव चे पदोन्नत मुख्याध्यापक अशोक राऊत, बेट सांगवीचे मुख्याध्यापक राणे,सुनेगावचे तंत्रस्नेही शिक्षक तिडके यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. सुनेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख इकबाल शेख यांनी शिक्षण आपल्या दारी या कार्यक्रमाची आवश्यकता व त्या अंतर्गत येणाऱ्या प्रशासकीय बाबी यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. शिक्षकांची यशोगाथा या सदराखाली तंत्रस्नेही शिक्षक तिडके यांनी आपल्या शाळेला कशा प्रकारे यशस्वीते कडे घेऊन गेले या विषयाची सविस्तर यशोगाथा त्यांनी खुमासदार पद्धतीने उपस्थितांना सांगितली.
दीनदयाळ विद्यालय बेटसांगवी येथील आनेराव, प्रा .शा. बेट सांगवी क्रं 2 चे मुख्याध्यापक कोल्हे, प्रा .शा. बोरगावचे मुख्याध्यापक उत्तरवार यांनीदेखील आपआपल्या शाळेमध्ये राबवण्यात येणारे नवनवीन उपक्रम या सदरात सहभाग नोंदवला. उपक्रमशील शिक्षक केंद्रे, प्रा. शा. बेटसांगवी क्र. २ तसेच कदम प्रा. शा .दगडगाव यांचा देखील गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षीय समारोपामध्ये शेवडी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागोराव जाधव यांनी भाषा व गणित या विषया मध्ये येणाऱ्या सर्व उपक्रम कसे राबवायचे व त्यावर आधारित कोणते अध्ययन प्रसंग निर्माण करावयाचे तसेच केंद्रांतर्गत सर्व प्रशासकीय सूचना दिल्या .
पळशीचे मुख्याध्यापक श्रीराम कलने यांनी शिक्षण आपल्या दारी या अंतर्गत येणाऱ्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विश्लेषण करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री सोनकांबळे सर मुख्याध्यापक प्रा .शा. कपिलेश्वर सांगवी यांनी आपल्या प्रभावशाली शैलीमध्ये केले तर आभार प्रदर्शन मोरे डी यू मुख्याध्यापक प्रा शा पिंपरणवाडी यांनी केले. के. प्रा. शा. शेवडी बाजीराव या शाळेने याप्रसंगी सुरुची भोजनाची व्यवस्था केली होती. शिकू आनंदे, गोष्टींचा वार शनिवार, शंभर दिवस वाचन अभियान, अभ्यासमाला २.०, स्वाध्याय ३.० आदी मुद्यांवर शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. या शिक्षण परिषदेत शेवडी बा. केंद्रांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.