नांदेड| छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव शिवप्रतिमा पूजन, शिव रत्न पुरस्कार वितरण व भव्य अन्नदान वाटप करूण उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे, उद्घाटक संत बाबा सुभेदारजी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे, डॉ. शितल भालके, माजी विरोधी पक्ष नेता दिलीप सिंग सोडी, रेणुकाताई गावंडे, बजरंग भेंडेकर हे प्रमुख पाहुणे होते. स्वागत अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे होते. इंजी. तानाजी हुसेकर, शिवव्याख्याता सौ. सुचिता शाम वडजे पाटील, डॉ. मृत्युंजय महिंद्रकर यांना शिवरत्न पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ जोंधळे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जिजाऊ वेशभूषेतील महिलांचा व कन्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक छावा श्रमिक संघटना मराठवाडा अध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठान संचालक भास्कर हंबर्डे, सौ.माधुरी हंबर्डे ,राजू शेट्टी पाटील हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत काळे पाटील, शिवानंद कांबळे, अभिषेक हंबर्डे,अजिंक्य हंबर्डे,अनुष्का हंबर्डे,अविनाश हंबर्डे,किरण बनसोडे, आदित्य यादव ,प्रवीण माडजे, विशाल राठोड, पवन पाटोळे, तुतारी वादक सुरेश खंदारे,अनिता चौधरी,गौरी सखाराम शितळे, गोविंदभाऊ वट्टमवार, शिवाजीराव सुरवंशी,मंगेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.