नवीन नांदेड। 26 फेब्रुवारी रोजी आपल्या स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाची परीक्षा आहे आणि त्याच रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे आणि योगायोगाने या पूर्वपरीक्षेचा परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा आणि आपल्या पदव्युत्तर विभागाच्या परीक्षेची वेळ एकच असल्यामुळे आपल्या पदव्युत्तर विभागाचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या गट-ब परीक्षेला पण बसलेले आहेत.
त्यामुळे त्यांचे नुकसान होईल त्यांना कोणतीही एकच परीक्षा देता येईल त्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या वतीने 26 फेब्रुवारी या तारखेचा पेपर पुढे ढकलण्यात यावा व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अश्या आशयाचे निवेदन मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंट(मास) या विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांना पाठवून विनंती केली आहे
पुढे बोलताना श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी सदरील निवेदनाची एक प्रत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ.रवी सरोदे सर यांना देखील पाठवली आहे असे सांगितले व नक्कीच कुलगुरू महोदय व परीक्षा मंडळाचे संचालक विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त केली आहे.