नरसी। नरसी येथे संत शिरोमणी राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांची 643 वी जयंतीनिमित्त सकाळी प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या किर्तनातून समाज प्रबोधन व राष्टसंत रोहीदासजी महाराज यांच्या जिवणावर प्रकाश टाकण्यात आले. सकाळी आठ ते दहा बाजे पर्यंत प्रबोधन चालू होते. गेल्या आनेक वर्षांपासून भक्ती भावाने जयंती साजरी केली जाते. यावेळी सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर म्हणाले की, जयंती निमित्त सर्व समाज बांधव आपले सर्व हेवेदावे विसरून एकत्र आल्याचे समाधान लाभते. राष्ट्रसंत यांच्या जंयती निमित्ताने होत आसलेला इत्तर खर्च म्हणजे हार.शाल,श्रीफळ, जाहिरातबाजी इत्यादींचा खर्च कमी करून समाजातील गरजूवंताची गरज किवा शालेय विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल याचा विचार आयोजकाने केल्यास त्या राष्ट्रसंताची खरी जयंती साजरी झाल्याचा अंनद होईल.फक्त जयंती पुरतेच सघंटन कार्र न करता वर्षभर समाज उपयोगी सामाजिक. शैक्षणिक उपक्रम राबवावेत आसे ही शिवराज पाटील होटाळकर यानी अध्यक्षीय समारोपात प्रतिपादन केले.
देशात जातीयतेच्या विरोधात बंड उभारण्याची हिम्मत 14 व्या शतकात संत रोहिदास महाराज यांनी दाखवली. मनुष्य जातीने नाही तर आपल्या कर्माने माणूस लहान-मोठा होत आसतो. आपण सर्वजण समान आसल्याची शिकवण संत रोहिदास यांनी दिल्याचे मत भाजपा महिला मोर्चा प्रदेशउध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. यांनी संत रोहीदास महाराज याचा जन्मपासून केलेल्या संत कार्याचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नरसी च्या वतीने श्री संत शिरोमणी जगद्गुरु रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती उत्साहात संपन्न झाली.
दिनांक 18/2/22 रोजी सकाळी आठ तीस वाजता हरिभक्त परायण सद्गुरु गाथामूर्ती गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या महान कीर्तनाने सोहळ्याने नरसी परिसरात भक्तिमय वातावरण टाळ्यां व चिपळ्या च्या गजरात व प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या ठेक्यात नरसी शहर गजबजले होते. या कार्यक्रमासाठी भाजपा महिला मोर्चा प्रदेशउध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर .माजी जि.प,सभापती शिवराज पाटील होटाळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र पाटील भिलवंडे.प,स नायगांव उपसभापती संजय पाटील शेळगांवकर, प्रकाश पाटील भिलवंडे.पत्रकार सुनिल रामदासी,संतोष देशमुख शेळगांवकर याची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केरबाजी शेळगावकर. बालाजी शेळगावकर. दत्ता शेळगावकर. अनिल शेळगावकर. लक्ष्मण सटवाजी शेळगावकर. मारुती गंगासागरे, लक्ष्मण हवेलीकर. हनुमंत गंगासागरे माधव गंगासागरे लक्ष्मण कांबळे तुकाराम करकले लक्ष्मण करकले विठ्ठल हराळे मारुती गंगासागरे दिगंबर गंगासागरे दत्ता गंगासागरे सदा गंगासागरे रावजी करकले लक्ष्मण हवेलीकर शिवाजी कांबळे तुकाराम गंगासागरे यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रास्तविक बालीजी शेळगांवकर यानी केले तर सुत्रसंचलन पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर यानी केले.