नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१९ फेब्रुवारी रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रात लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांची प्रतिमा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे सुपूर्द केली.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.