आ. मोहनराव हंबर्डे यांचा स्तुत्य उपक्रम
नविन नांदेड। डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथी आणि डॉ. शंकररावजी चव्हाण व सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णासाठी व त्यांच्या नातेवाईकांना भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन दि 26 फेब्रुवारी २२ रोजी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने करण्यात आले होते. या अन्नदानात सामान्यांपासून मंत्रीमहोदयांपर्यंत उपस्थिती लावून भोजनाचा आस्वाद घेत या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.
विष्णुपुरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरचे हजारो रुग्ण व त्याचे नांतेवाईक उपचारासाठी येत असतात. रुग्णाच्या काळजी पोटी त्यांना जेवनसुद्धा गोड लागत नाही आणि रुग्णांना सकस आहारसुद्धा मिळत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करुन आणि डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून नांदेड दक्षिण मतदार संघाचे आ. मोहनराव हंबर्डे यांनी दि. 26 फेब्रुवारी रोजी कै. डॉ. शंकररावजी चव्हाण व सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्य डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री अशोकराव चव्हाण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, डॉ.जमदाडे, जि.प.सदस्य, मनोहर पाटील शिंदे, डॉ.कालिदास मोरे, प.स.सदस्य श्रीनिवास मोरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,ओमप्रकाश (राजू) मोरे, परमेश्वर पवार,नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले, सचिन हाटकर, संरपच राजु हंबर्डे, पिंटू पाटील शिंदे, विश्वनाथ हंबर्डे, हणंमतराव भवर, संतोष हंबर्डे,हरिष असावनी, जितेंद्र जेठाणी,पवन सारडा, पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कै.डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन अन्नदान वाटपाला सुरुवात करण्यात आली.
आमदार मोहनराव हंबर्डे यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे जनतेतून मोठे कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णुपुरी येथील समस्त गावकरी मित्र मंडळींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचलन शिवराम लुटे तर अन्नदान वाटप यशस्वी करण्यासाठी नरसिंग हंबर्डे ,राहुल हंबर्डे ,जयसिंग हंबर्डे, ,राजु मोरे, अँड.एजाज शेख, विठ्ठल हंबर्डे, उमाकांत शिंदे,राजेश हंबर्डे,बळंवत हंबर्डे, शामराव हंबर्डे, रघुनाथ शिंदे, शिवप्रसाद कुबडे,बाळु हंबर्डे,रफिक शेख,दिंगाबर हंबर्डे,दिपक हंबर्डे, यांच्या सह मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.