नविन नांदेड। महिला काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यर्कत्या सौ. ज्योती संदीप कदम यांच्यी वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते देण्यात आले.
सौ. ज्योती कदम यांनी सिडको परिसरातील महिला यांच्या साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटेचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी ही नियुक्ती केली आहे, कदम परिवारातील सुभद्रा कदम यांनीही काँग्रेसच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते.
आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दि.२५ फेब्रुवारी रोजी आ.मोहनराव हंबर्डे व विनोद कांचनगिरे,राजु लांडगे,संदीप कदम , सुभद्रा कदम यांच्या ऊपसिथीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,युवा नेते उदय भाऊ देशमुख, माजी नगरसेवक अशोक मोरे, सिध्दार्थ गायकवाड, माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, डॉ.करूणा जमदाडे, सिंधु ताई तिडके,दलीत मित्र नारायण कोंलबीकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.