नविन नांदेड। महाशिवरात्री निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेशवर विष्णुपुरी मंदिर देवस्थान येथे दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण ग्रामपंचायत संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे व पदाधिकारी यांनी विष्णुपुरी येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करून दिले.
नांदेड तालुक्यातील व पंचक्रोशीत जाज्वल्य व नवसाला पावणाऱ्या या महादेव मुर्तीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीसाठी येण्याचं निमंत्रण ग्रामपंचायत माजी संरपच तथा संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे यांनी विष्णुपुरी येथे आयोजित कार्यक्रमात दिले आहे.
महाशिवरात्री निमित्ताने काळेशवर विष्णुपुरी मंदिर देवस्थान येथे अंखड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाशिवरात्री निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी येण्याची विनंती केली या वेळी माजी पालकमंत्री डि.पी.सांवत,आ.अमर राजुरकर व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
२८ रोजी विष्णुपुरी येथे तिनं कबिनेट मंत्री ऊधदाघटनासाठी आहेत, त्यामुळे काळेशवर मंदिर ही भेट ही विशेष महत्वाची ठरणार आहे. यावेळी उपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, संतोष हंबर्डे,राजेश हंबर्डे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी ऊपसिथीत होते.