उस्माननगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी-NNL

उस्माननगर, माणिक भिसे। अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्माननगर येथील विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून, भगवाध्वज फडकावून , मोटर सायकलची रॅली काढून उत्साहात साजरी करण्यात आली.                   

सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे येथील प्रथम ज्येष्ठ महीला सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, ग्रामसेविका सौ.शिंदे - माने, उपसरपंच शेख बाशीदभाई, मा.पं.स. सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड, पोलीस पाटील विश्वाभंर मोरे,प्रा.विजय भिसे, ग्रामपंचायत सदस्या सौ. संगिता विजय भिसे, संजय वारकड, शेषेराव पा.काळम, अंगुलीकुमार सोनसळे, कमलाकर शिंदे, शिवशंकर काळे, गोविंद पोटजळे, अशोक काळम, गोविंद भिसे, अमिनशा फकीर, काळबा भिसे,नरेश शिंदे,संजय भिसे,सद्दाम पिंजारी, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर विद्यालय येथे केशवराव काळम,संजय पाटील घोरबांड,प्रल्हाद पाटील घोरबांड, संदीप पाटील घोरबांड, यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.समता विद्यालय येथे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, बसवेश्वर डांगे, बालाजी भिसे,राम पवार यांच्यासह उपस्थित होते.सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, भगवान राक्षसमारे,मन्मथ केसे, लाटकर, शेख, यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील, प्रदीप देशमुख, सुर्यकांत माली पाटील, गणेश लोखंडे,लक्ष्मण कांबळे, यांच्यासह उपस्थित होते. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्रिमूर्ती विद्यालय येथे सहशिक्षक दौलत पाडांगळे, सुनिल जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

दुपारी बसस्थानकाजवळील झेडा चौक येथे ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांच्या हस्ते भगवा ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन येथील दत्त मंदिर देवस्थानचे प्रमुख गुरुदत्त बन महाराज यांच्या हस्ते  करण्यात आले.यावेळी तेलंगवाडीचे सरपंच सुरेश मामा बास्टे,प्रा.विजय भिसे, पोलिस पाटील मोरे, ग्रामसेविका शिंदे, माने, गावातील नागरिक, तरुण, उपस्थित होते.सकाळी गावातील प्रमुख रस्त्याने मोटरसायकलवरून रॅली काढण्यात आली.व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकार करीत परिसर दुमदूमला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी