नांदेड| जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त् त्यांच्या जिवनावरील आधारीत ग्रंथाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद महिला बालविकास उपायुक्त् श्रीमती रेखाताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, प्रा.राजीव वाघमारे,के.एम.गाडेवाड, विठठल काळे, ॲड.श्रीनिवास शेजुळे,संजय पाटील,गजानन कळके,संजय सुरनर, बुध्देवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रंथ प्रदर्शन सर्वांकरिता खुले असुन सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.