किनवट। तालुक्यातील गोकुळनगर येथे बहुजन प्रतीपालकी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज फलाकाचे अनावरण व 31 फुट भगवा झेंडा उभारण्यात आला.
फलकाचे उद्घाटन चेंपतराव पा. मुंगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराज्य मित्र मंडळ नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष निरंजन भाऊ मिराशे, बालाजी बामने, संतोष पा.अडकिने शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप पा.मुंगल, उपाध्यक्ष सारंग पा. पवार, सचिव किशन पा.मुंगल ,भरत पा.,व्यंकट पा., नामदेव पा.कदम ,संभाजी जाधव,राम उबाळे,श्री पवार, प्रविण पवार,तानाजी पा., आनंदा जाधव, विजय जाधव,बारकु पाटील,पमु मुंगल, गजानन कदम, चक्रधर मुंगल,राम कदम, मुन्ना लांडगेवाड प्रभु हाळे,अनेक शिव भक्त उपस्थित होते.