नायगाव, दिगंबर मुदखेडे| प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेंड शाखा नायगाव तालुक्याच्या वतीने श्री, संत गाडगे बाबा यांची जंयती साजरी करण्यात आली.
यावेळेस प्रहार दिव्यांग संघटना नादेंड जिल्हा कार्य अध्यक्ष मा, गोपीनाथ मुडे़ सांगविकर, दत्ता ओटंबे महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ नादेंड जिल्हा अध्यक्ष यांनी संत्गा डगे बाबा संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक 'कीर्तनकार, संत' आणि समाज सुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती, ते 'सामाजिक न्याय' देण्यासाठी विविध गावांना भटकत असत.
गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रूची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदलोनामध्ये ज्या महापुरूषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरं, पुण्य समजती पापाला ही धोंड्याला म्हणती देवता, भगत धुंडती तया जोगता... स्वत:च देती त्यास योग्यता, देव म्हणूनी कुणी न भजावे, फुका शेंदरी दगडाला....कुणी न रहावे खुळे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी ...ह्यासाठी ही झिजते वाणी, मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला...हेच मागणे तुला श्रीहरी, घाम गाळी त्या मिळो भाकरी...कुठेच कोणी नको भिकारी, कुणी कुणाचा नको ऋणकरी कुणी न विटो नर जन्माला...असा संदेशशी यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग संघटना नायगाव तालुका अध्यक्ष मा, साईनाथ बोईनवाड समाज सेवक मा, माधव पा, चव्हाण गुरू पा. मा. बाळु ईकळीकर महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ नायगाव तालुका अध्यक्ष मा, शैलेश ईबितवार जिल्हा परिषद चे कर्मचारी मा, सोडारे साहेब महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ नायगाव कार्य अध्यक्ष मा, संभाजी खडके महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ नायगाव तालुका उपध्यक्ष मा, भरत इभुते मा, बालाजी वडपत्रे मा, मारोती तेलंग मा, नामदेव गंगावळे सुधाकर पाचांळ व इत्तर दिव्यांग पदधीकारी उपस्थित होते.