एसएफआय विद्यार्थी संघटनेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
नवीन नांदेड। पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ वर्षाची रक्कम आठ दिवसाच्या आत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी दि २३ फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्या कडे एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेडच्या वतीने करण्यात आली.
कोरोना , ओमायक्राॅन महामारीमुळे राज्यातील वस्तीगृह, महाविद्यालय विद्यापीठ बंद ठेऊन सरकाराने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण अतिदुर्गम भागात खेड्या , पाड्यात ,वाडी ,तांड्यावर राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांनाचा सरकाराने कोणताही विचार केला नाही.त्यामुळे या दुर्गम भागात मोबाईला इंटरनेट नेटर्वक मिळत नसल्याने हे आदिवासी विद्यार्थी नांदेड सारख्या शहरातच रूम किरायाने घेऊन राहत आहेत.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आई वडिल पोटाला पिळ मारून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवत होते.मात्र आता घरच्या कडून पैसे पाठवले जात नाहीत व शिष्यवृत्ती ही मिळाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
सरकार कडून आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयंम शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो.या शिष्यवृती योजनेच्या आधारावर हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र सदरिल शिष्यवृतीची रक्कम अध्याप विद्यार्थांना मिळाली नसल्याने विद्यार्थी हतबल होऊन शिक्षण सोडून गावी परत जाण्याच्या मार्गावर आहेत.
त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून आठ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यावर पंडित दिनदयाळ स्वयंम शिष्यवृती योजनेची रक्कम जमा करावी.
अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतिने विद्यार्थ्यांना सोभत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिले आहे.आंदोलन करून न्याय नाही मिळाल्यास एसएफआय च्या वतीने उपोषणाला बसण्यात येईल असे देखील निवेदनात म्हणटले आहे.या निवेदनावर काॅम्रेड पवन जगडमवार , दिनेश येरेकर, संतोष मंत्री , सुमित अंबरबंडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.