किनवट| कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी हे होते. त्यांच्या जिल्हा अध्यक्ष पदाची निवड झाल्यापासून त्यांनी प्रथम किनवट माहूर तालुक्यात प्रथमता आल्याबद्दल तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ता मार्फत यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी बैठकीच्या कार्यक्रमात पुढे म्हणाले की, येणारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायचे असून, तर त्यासाठी आपल्याला युवा कार्यकर्ता मार्फत प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांची शाखा स्थापन झाली पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात ही शाखा स्थापनेच्या कामाला सुरुवात होईल असे म्हणाले.
त्यावेळी युवक कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे ,राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष किनवट माहूर राहुल नाईक, युवक तालुकाध्यक्ष अजित साबळे ,युवा नेते बालाजी भाऊ बामणे, राजू पाटील सुरवसे, बंटी आडे ,प्रमोद राठोड ,सुगत नगराळे ,दत्ता पवने ,महेश कनकावार , अश्विन पवार अमोल जाधव ,अवधूत कदम ,रामदास राठोड, विनोद कोळगिरी, जयपाल जाधव ,राकेश तोटावार ,अनुप वासाठे, आकाश मुंडे ,सुरज भालेराव,निर्गुण कदम, इत्यादी युवक उपस्थित होते