नांदेड| नांदेड जिल्ह्यात मोबाईल चोरट्यांच्या टोळीच्या लोकांनी अनेकांना हैराण करून सोडले आहे, त्याचा पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने शिवाजीनगर पोलीस ठाणे परिसरातून चोरून नेलेल्या दोन मोबाईल घटनेचा शोध घेतला. दोन मोबाईल व अन्य ७ असे एकूण ९ मोबाईल १ लक्ष ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, निजामाबाद येथे असलेल्या दोन चोरट्यांना अटक केल्याने मोबाईल चोरट्यामध्ये खळबळ उडाली आहे.
नांदेड शहरातील गोकुळनगर भागातून दोघाजणांचे मोबाईल चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केली होती. त्यावरून स्थागुचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मोबाईल ट्रेस केले असता निजामाबाद शहरामध्ये हे मोबाईल असल्याची माहिती मिळाल्यावर पथकातील पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांना देऊन पोलीस पथक निजामाबाद येथे रवाना केले. पोलीस पथकाने सदरील आरोपी राहत असलेल्या भागात जाऊन मोठ्या शिताफीने शेख अबुबकर शेख इकबाल वय २४ वर्ष आणि मोहम्मद खय्युम मोहम्मद खाजा वय ४३ वर्ष या दोघांना पकडून आणले.
त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरीला गेलेले ३७ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले. तसेच या दोन्ही चोरट्यांकडे पोलीस जप्तरी नोंद असलेले आणखी ९ मोबाईल सापडले. त्यांची किंमत १ लक्ष ४० हजार रुपये आहे. असे एकूण १ लक्ष ७७ हजार रुपये किंमतीचे मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने या चोरट्याकडून जप्त केले आहेत. या मोबाईल चोरट्याना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हि कार्यवाही पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, भोकरचे विजय कबाडे, स्था गुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, अफजल पठाण, देविदास चव्हाण, सुरेश घुगे, राजू सिटीकर, दिपक ओढणे आणि गजानन बैनवाड यांचे पार पडली आहे.