नांदेड| दि.२३ फेब्रुवारी, २०२२ बुधवार रोजी ”संत गाडगेबाबा” यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गाडगे बाबांच्या प्रतिमेला अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर यांनी गाडगेबाबा जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. तसेच श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप-अधिक्षक (मुख्यालय), शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, श्रीमती शिंदे, सपोनि प्रदिप अल्लापुरकर, पोउपनि पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड इतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सपोउपनि उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, पोना संजय सांगवीकर, पोकॉ आकाश बारोळे, पोकॉ विनोद भंडारे यांनी परिश्रम घेतले.