नांदेड जिल्हा संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांची माहिती
नांदेड| राष्ट्रीय कवि संगम तर्फे महाशिवरात्रीला श्रीलंका येथून निघून ६५०० किमी अंतर पूर्ण करून रामनवमीला आयोध्या येथे जाणारी श्रीराम वनगमन पथकाव्य रथ यात्रा १५ मार्च रोजी नांदेड येथे येणार असून त्यादिवशी शोभायात्रा व कविसंमेलनात हिंदू धर्मातील सर्व जातींच्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कवि संगम नांदेड जिल्हा संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
रविवारी हनुमान टेकडी च्या सभागृहात झालेल्या बैठकीत विश्व हिंदू परिषदेचे शशिकांत पाटील व गणेश कोकुलवार, राम जन्मोत्सव समितीचे गणेशसिंह ठाकूर, भाजपाचे अनिलसिंह ठाकूर, धीरज स्वामी, श्रीराज चक्रवार, बजरंग दलाचे महेश देबडवार, चेतन पंडित, डॉ. मनीषा तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सर्वानुमते असे ठरले की, कविसंमेलनात नांदेड जिल्ह्यातील २१ संत महंतांचा
गौरव करण्यात येणार आहे. तसेच हिंदू धर्मात असलेल्या अठरापगड जातीच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जातीच्या जिल्हा कार्यकारिणीने आपल्या जातीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाची शिफारस समितीकडे करावी असे आवाहन करण्यात आले.
बैठकीमध्ये शिवासिंह ठाकूर, सागर जोशी, सोनु उपाध्याय, कृष्णा इंगळे, नरेश आलमचंदनानी, सौ किरण मालु, सौ कलावती काकाणी, श्रीमती शोभा जाजु, लक्ष्मिकांत कळणे, बालाजी कोमटलवार, रोहीत हिवरे, सुधाकर थिटे, हितेश उदावंत, बालाजी चौधरी, सुनिल रागेला, शैलेश कांकर, ओंकार कुलकर्णी, अनिकेत कुलकर्णी, सत्यम मंत्री, प्रणव नाईक, संजय देऊळगांवकर, शिवाजी मंटाळकर, मथन कोमटवार, संजय मोटे, मनिष बियाणी, कृष्णा किणरी, गणेश बेत्तेवार, तुलजेश कुरील, यांच्यासह अनेक राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.