नांदेड| संयुक्त कामगार कर्मचारी समितीने पुकारलेल्या 28 व 29 मार्चच्या देशव्यापी संपाबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नांदेड जिल्हा कामगार, कर्मचारी संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठक आज दि.1 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता लालबावटा कार्यालय, सोमेश कम्पाऊंड मिल गेट येथे आयोजित केली आहे.
संयुक्त कामगार कर्मचारी समितीने येत्या 28 व 29 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने कृती समितीच्यावतीने आज दि.1 मार्च रोजी मंगळवार सायं.4 वा. महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस कृती समितीत असलेल्या सर्व संघटना प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कॉ.ऍड.प्रदीप नागापूरकर, ना. रा. जाधव, कॉ.बी.के.पांचाळ, ऍड.अरविंद देशपांडे, कॉ.विजय गाभणे, कॉ.के.के.जांबकर, सुर्यकांत वाणी, प्रा.लक्ष्मण शिंदे, डॉ. किरण चिद्रावार, कॉ.ओ.के.जोशी, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.शिवाजी फुलवळे आदींनी केले आहे.