नांदेड| रयत क्रांती पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी उत्तमराव पा वडजे धामणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग पा. शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
शेतकरी, सर्व सामान्य नागरीकांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. त्यापुढे जावुन युवक, शेतकरी यांना सन्मान मिळावा याकरिता रयत क्रांती पक्षाची स्थापना केली. आजघडीला सबंध महाराष्ट्र भर कार्यकारिणी स्थापुन कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेले आहे.
उत्तमराव वडजे धामणगावकर यांचे आजपर्यंतचे केलेले सामाजिक कार्य पाहता वडजे यांची रयत क्रांती पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वडजे धामणगावकर यांच्या नियुक्ती नंतर सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.