ग्रा.पं.कार्यालय व जि.प.प्रा.शा.जवळा यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी
नांदेड| जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील व लोहा तालुक्यातील जवळा (दे) या गावामध्ये संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने शाळेच्या परिसरात व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ,शाळेतील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या माध्यमातून संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी आकाशवाणीचे प्रासंगिक उद्घोषक आनंद एस. पि.गोडबोले, शाळेतील मुख्याध्यापक ढवळे जि एस, सहशिक्षक संतोष आंबुलगेकर,संतोष घटकार ,माजी सरपंच कैलास गोडबोले, सरपंच प्रतिनिधी सुरज शिखरे ,ग्रा.प.कर्मचारी मारोती चक्रधर, हैदरसाब शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा यांचे विचार म्हणजे,'धोंडापाणी देव रोकडा सज्जनी , असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.
देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देव देवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशा बोलीभाषेतुन, समाज जागृती करणारे, केवळ परिसर स्वछतेचे जनकच नव्हे तर माणसाचे अंतरंग स्वच्छ करणारे, संत गाडगे बाबा यांच्या जयंतीदिनी त्यांना स्वच्छतेची कामे करून गावातील नागरिक व शाळेतील विध्यार्थ्यांनी विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमात प्रथमतः थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व धुप पुजा करून मान्यवरांनी व शालेय विध्यार्थ्यांनी अभिवादन केले.
आणि परिसरातील काडी कचरा, दुरगंधी साफसफाई करण्यास प्रारंभ केला. यावेळी प्रमुख पाहुणे आनंद एस.पि.गोडबोले,शाळेतील मुख्याध्यापक ढवळे जि एस, सहशिक्षक संतोष आंबुलगेकर,संतोष घटकार ,माजी सरपंच कैलास गोडबोले, सरपंच प्रतिनिधी सुरज शिखरे ,ग्रा.प.कर्मचारी मारोती चक्रधर, हैदरसाब शेख, ग्रा.प.कर्मचारी मारोती चक्रधर,शालेय विद्यार्थी सानिया पठाण , पंचशील गच्चे,साक्षी गच्चे,रितेश गवारे, कोमल चक्रधर,साक्षी गोडबोले, मुंजाजी शिखरे, विवेक गोडबोले, मुस्कान पठाण, पंकज गोडबोले, दिपाली गोडबोले,प्रज्ञा गोडबोले, प्रियंका गोडबोले,कर्मचारी शेख हैदरसाब ,यांच्या सह गावातील नागरिक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.