लोहा| राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची १०६ वी जयंती सोहळा लोह्यात रामदास पाटील सोमठाणकर मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
जुना लोहा येथे राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरीकरण्यात आली. जयंतीनिमित्त रामदास पाटील सोमठाणकर मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शेटे, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, स्वप्निल शेटे,बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हरिभाऊ शेटे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आनेराव, राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ चे बालाजी जाधव, पत्रकार तुकाराम दाढेल, सदानंद धुतमल, शिवराज दाढेल, सुभाष बनसोडे, पिंटू वड्डे, संतोष कंकरे, शिवा कातुरे, गजानन शेलगावकर, बबलू कांजले, मारुती वड्डे ,चंद्रकांत सोनवळे, उमाकांत सोनवळे,माधव स्वामी,राजु चव्हाण, बाबुशा महाराज, दिगंबर महाराज सावरगावकर, बालाजी केंद्रे,मारोती मामा आदी उपस्थित होते.