नांदेड। नागापूर,वांगी,ईजेगाव ,पुयडवाडी, सिध्दनाथ, फत्तेपूर सहा गावातील विघुत देयके भरूनही विज पुरवठा अचानक बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेनेचे नांदेड दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख आंनदराव पाटील बोढारकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील महावितरण कार्यालयाशी अंभियता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. असता उपलब्ध झाले नाही. अखेर भ्रमनधवनी वरून अधिक्षक अभियंता जाधव यांच्याशी जिल्हाप्रमुख आंनदराव पाटील बोढारकर यांनी चर्चा केली अखेर विघुत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी ऊपसिथीत शेतकरी व शिवसैनिकांनी घोषणा बाजी केली.
नांदेड तालुक्यातील नागापूर,वांगी,इंजेगाव,पुयडवाडी , सिध्दनाथ, फत्तेपूर, येथील शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यां पुर्वी चारही गावातील शेतकरी यांनी प्रत्येकी ७५०० विघुत देयके भरली आहेत पंरतु शेतकऱ्यांचा विघुत पुरवठा २५ फेब्रुवारी रोजी अचानक बंद केला , सकाळी विचारपूस केली असता विधुत देयके न भरल्याने विजपुरवठा कट केल्याचे सांगितले, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख आंनदराव पाटील बोढारकर, व तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, आयोजक युवासेनेचे नांदेड तालुका प्रमुख बालाजी पाटील सपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांना सह शिवसैनिकांनी धाव घेतली,शनिवार असल्याने कार्यालयात मात्र वरीष्ठ अधिकारी भेटू शकले नाही.
सध्या अनेक शेतकऱ्यांचा शेतात ऊस, गहू,भुईमूग टाळकी, केळी, ही पिके असुन पाण्याअभावी वाळणयाची शक्यता असल्याने तात्काळ विजपुरवठा चालु करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष शाम वानखेडे,संघटक बालाजी पाटील भायेगावकर, बाबुराव गाडेगावकर, मारोती कर्डिले,ज्ञानेशवर मस्के, मारोती मस्के, दिलीप सिंग हुजुरे, व्यंकटी कर्डिले, सचिन सपुरे,देवानंद मस्के,कचरू सपुरे, दिलीप मस्के, राजु मस्के, गजानन कर्डिले, तिरूपती कर्डिले,ज्ञानबा कर्डिले, प्रकाश मस्के यांनी ईशारा दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी, व महावितरण ने पुर्व सुचना न देता लाईट कट करु नये अशा घोषणा दिल्या.
जिल्हा प्रमुख आंनदराव पाटील बोढारकर यांनी अधिक्षक अभियंता जाधव यांच्याशी चर्चा केली व महावितरण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यापुढे पुर्व सुचनेनुसार विज कट करावी अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांशी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असा इशारा दिल्यानंतर विजपुरवठा सुरळीत होण्याचे आश्वासन दिले.