मुखेड येथील महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन-NNL

मुखेड,  दादाराव आगलावे। मागील अनेक वर्षापासून मुखेड येथे महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी दिनांक 24 ते फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील कार्यक्रम कोव्हीड नियमांचे पालन करून होणार असल्याची माहिती महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे सचिव लक्ष्मण पत्तेवार यांनी दिली आहे.

पहाटे पाच ते सहा काकडा, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी एक ते दोन गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 पोथी, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री साडे आठ ते साडे दहा हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २४ फेब्रुवारी रोज गुरुवारी ह.भ. प. भागवताचार्य रमेश महाराज बुचाले परभणी यांचे कीर्तन तर दिनांक २५ रोज शुक्रवारी ह.भ. प. भागवताचार्य शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर, 26 रोजी ह.भ. प. समाजप्रबोधनकार जयश्री ताई तिकांडे महाराज अहमदनगर, दि.२७  रविवारी ह.भ. प. समाज प्रबोधनकार सौ. मीनाताई महाराज हिपळनारीकर, दि. 28 सोमवारी ह.भ. प. रामायणाचार्य श्रीधर महाराज कासराळीकर, 


दि. १ मार्च मंगळवारी ह.भ. प. राम महाराज कदम पंढरपूरकर, दि. २ मार्च बुधवारी ह.भ. प. विनोदाचार्य माणिक महाराज रेंगे परभणी तर दि. 3 मार्च रोजी गुरुवारी ह.भ. प. विनोदाचार्य माणिक महाराज रेंगे परभणी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख म्हणून कैलास महाराज पुरी, काकडा प्रमुख पांडुरंग लच्छमाजी लोखंडे, विणेकरी प्रमुख ह. भ.प. आनंद महाराज कमळेवाडी, हरिपाठ प्रमुखह.भ.प. रावीकर गुरुजी, मृदंगवादक म्हणून नारायण सलगरे, संजय उमाटे गुरुजी, माधव कमळेवाडी, ज्ञानेश्वर कोकाटे उपस्थित राहणार आहे. 

 गायक म्हणून नरसिंग महाराज शिंदे, आनंद महाराज कमळेवाडी, सटवा महाराज मुखेड, राशीचक्र गुरुजी, हणमंत सादगीर कमळेवाडी, रमेश श्रीरामे, देविदास वाघमोडे, परमेश्वर कोकाटे, तानाजी गोकुळवाडी हे सहभागी होणार आहेत तर कमळेवाडी, आडमाळवाडी, कोटग्याळ,पांडुर्णी, तसेच ज्ञानेश्वर भजनी मंडळ व विठ्ठलेश्वर भजनी मंडळ मुखेड सहकार्य करणार आहेत. सर्वांनी या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन महादेव मंदिर विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी मुखेड यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी