नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या विविध ठिकाणी काम करणार्या कर्मचारी याचे विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी शासन व प्रशासनाकडे कित्येकदा ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता परंतु एकही मागणी मंजूर झाली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 23 व 24 फेब्रुवारीला राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलन होणार आसुन यात नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक.ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यानी सहभागी व्हावे आसे अव्हान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनजंय पाटील वडजे यानी केले आहे.
या आंदोलनात मगीतलेल्या मागण्य नविन पेन्शन योजना रद्द करुण जूनी पेन्शन योजना चालू ठेवावी.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदे बंद करुन पंचायत विकास अधिकार हे पद निर्माण करावे.मनरेगा साठी स्वतंत्र यंत्रणा करणे.कोरोना काळात कार्यावर काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचारी याना 50 लक्ष रूपये त्वरित द्यावे, सर्व रिक्त पदे तात्काळ भरावे. ग्रामसेवक वैद्यकीय नर्स व चतुर्थ श्रेणी च्या कर्मचारी यांच्या मागण्या प्रलंबित न ठेवता मार्गी लावावे.
सेवानिवृत्त वय 60 करावे.नविन शिक्षण धोरण रद्द करावे. ग्रामसेवक संघटनेस मेडिकल क्यासलेस सुविधा उपलब्ध करूण द्यावे,ग्रामसेवक संघटनेचे नियमावली तयार करण्यासाठी सहकार्य करावे,आश्या आनेक आडचणी-समस्याचे निराकरण करण्यासाठी हा दोन दिवसीय लाक्षणिक संप आहे व यात नांदेड जिल्ह्यातील सर्व जि,प,पं,स व शासकिय,खाजगी कर्मचारी सहभागी होणार आहेत आसे मत धंनजय पाटील वडजे यानी व्यक्त केले.
या निवेदनावर ग्रामसेवक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील वडजे.जिल्हा सचिव हाणमंत वाडेकर.राज्य सघंटक एन,डी,कदम जिल्ह कार्यध्यक्ष श्रीनिवास मुगावे मानद अध्यक्ष गोविद माचनवाड. जिल्हा कोष्ध्यक्ष धमानंद धोत्रे.यांच्या वतीने एका लेखी निवेदना द्वारे सर्वाना कळवण्यात आले आहे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने या संपात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यानी 100% सहभागी होऊन सहकार्य करतील आसा विश्वास नांदेड जिल्हा ग्रामसेवक संघटनेने व्यक्त केला आहे