जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी कर्मचारी वर्गासोबत सहानुभूति दर्शवली
नांदेड| येथील सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेत कार्यरत जवळपास 350 कर्मचाऱ्यांना सेवेत करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ता स. लखनसिंघ लांगरी, स. लड्डूसिंघ काटगर, स. गुरमीतसिंघ टमाना यांनी सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी गुरुद्वारा बोर्डातील अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्या विषयी सहकार्य करण्याची विनंती केली. मा. जिल्हाधिकारी साहेब डॉ इटनकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा विषय नियमास अनुसरून व कायद्याच्या निर्देशांचे पालन करत बोर्डाने सोडविला पाहिजे.
वरील मागणीकडे बोर्डाने सगानुभूतिपूर्वक लक्ष्य पुरवावे यासाठी आमच्यावतीने निवेदन बोर्डाकडे वर्ग करण्यात येईल. प्रस्तुत निवेदनात म्हंटले आहे की, गुरुद्वारा बोर्डात मागील पाच ते सहा वर्षापासून कर्मचारी रोजंदारी वर कार्यरत आहेत. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने अनेक वर्षापासून सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे. पण बोर्ड पदाधिकाऱ्यांच्या वतीने वरील मागणीकडे दुर्लक्ष्य करण्यात येत आहे. कोविड 19 च्या कठीण काळातही कर्मचारी वर्ग सेवेत तत्पर होता.
अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड देऊन कर्मचारी वर्ग काम करीत आहे. बोर्डाने अशा कर्मचाऱ्यांना त्वरित सेवेत कायम करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. बोर्डाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय घेण्यात यावा असा आग्रह करण्यात आला आहे.