नवीन नांदेड| नांदेड शहरात व आजूबाजूला सद्या चोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आसुन, नांदेड देगलूर मुख्य रस्ता धनेगांव चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारीच आसलेले राजा टायर्स दुकानात दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते बाराच्या दरम्यान दुकानाचे शटर तोडुन जवळजवळ तिन ते चार लाखाचे टायर चोरीला गेल्याची तक्रार दुकान मालक हाणमंतराव लक्ष्मणराव आगळे यानी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दिली.
नांदेड ते देगलूर रस्त्यावर चोवीस तास वाहातुक चालु आसते छत्रपती शिवाजी चौक लातुर बायपास रोड व बाजूलाच पेट्रोल पंप आसून सुद्धा चोरानी हि चोरी केली.या राजा टायर दुकानातील जवळजवळ मोठे टायर व काही छोटे टायर जवळजवळ 3 ते 4 लाखाचे टायर चोरीला गेले पहिलेच कोरोनामुंळे दोन वर्षे व्यवसायाचे काही खंरे नाही. त्यातच आश्या पद्धतीने चोरीचे नुकसान म्हणजे दुकान मालकावर आर्थिक नुकसानभरपाई कशी सहन होईल हाच प्रश्न दुकान मालकाला पडला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दुकान मालक हांणमतराव लक्ष्मणराव आगळे यानी झालेल्या चोरीचे तक्रारार नोदणी केली आसुन पोलीस कर्मचारी यानी आर्ज घेऊन गुन्हा दाखल केला आसुन पुढील तपास करित आहेत.