लिबंगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल
नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या लिबंगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकीवरून आलेल्यांची दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल विक्रीचे २१ हजार रुपये जबरीने काढून घेऊन दुचाकीवरून फरार झाले आहे. याप्रकरणी लिंबगाव पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे निळा शिवार ता. जि.नांदेड येथे दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजीचे दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास, निळा रोडवरील वैशालीताई पावडे यांचे पेट्रोल पंपावर अज्ञात तीन आरोपीतांनी संगणमत करुन एका नविन काळया रंगाच्या नंबर नसलेल्या पल्सर मोटार सायकलवर येऊन गाडीत दोनशे रुपयाचे पेट्रोल टाक असे फिर्यादीस सांगीतले.
यावेळी त्यांचे गाडीत पेट्रोल टाकले तेव्हा त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेले दोन अज्ञात ईसम खाली उतरले व त्यापैकी एकाने फिर्यादीचा हात पिरगाळला आणि दुसर्या आरोपीने पिस्टल सारखे दिसणारे हत्याराचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे हातातील पेट्रोल विक्री केलेली अंदाजे रक्कम ८ हजार तसेच फिर्यादी जवळ उभा असलेला त्यांचा सहकारी मुंजाजी ज्ञानेश्वर कदम यांना पण पिस्टल सारखे दिसणारे हत्याराचा धाक दाखवुन त्याचे जवळील पेट्रोल विक्रीतुन जमलेल्या अंदाजे १३ हजार असे एकुण २१ हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतले.
आणि सर्व आरोपी आलेल्या गाडीवर बसुन नांदेड रोडने पळुन गेले आहेत. अशी फिर्यादी मारोती प्रभाकर काळे, वय २२ वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. सुनेगाव ता. वसमत जि.हिंगोली यांनी दिल्यावरुन लिबंगाव पोलीस डायरीत गुरनं २१/२०२२ कलम ३९४, ३४ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि.पवार, मो.क्र. ९८२३२८८४५७ हे करीत आहेत.