छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव भागवत देवसरकर मित्रमंडळातर्फे आष्टी गटात साजरा -NNL

व्याख्यानाचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच वाटप 


हदगाव/नांदेड|
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती जिल्हा परिषद आष्टी गटातील विविध गावात भागवत देवसरकर मित्रमंडळातर्फे युवा नेते भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

19 फेब्रुवारी रोजी लिंगापुर येथील बुद्ध विहार येथिल आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करून विविध कार्यक्रमांना सुरवांत करण्यात आली. कंजारा येथील बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भागवत देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप तवर उपसरपंच सचिन कदम यांच्यासह गावातील बांधव उपस्थित होते. कोळगाव येथील शिवछत्रपतीच्या पुतळापूजन नंदू पाटील पवार, निळू पाटील जाधव यांच्यासह करण्यात आले आहे. पाथरड वायपना येवली येथील नियोजित स्मारकाच्या जागी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली.


20 रोजी लिंगापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तंटामुक्तीचे अध्यक्ष परसराम पाटील देवसरकर माजी सरपंच अनिल कवडे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील देवसरकर ग्रामपंचायत सदस्य आकाश कवडे, शिक्षक काळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्यच वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी वाळकी बाजार येथे हभप अजय महाराज महाजन यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या व्याख्यानाला परिसरातील गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती महाराजांनी व्यसनमुक्ती वर भर देत युवकांनी व्यसन सोडत शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.

याच कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केंद्रप्रमुख संदेश चोंडेकर मुख्याध्यापक राठोड सर भगवान कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आल, 22 फेबुवांरी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवली येथे प्रतिष्ठित नागरिक चंपतराव पाटील कवळे पोलीस उपनिरीक्षक किरवले साहेब, मुख्याध्यापक माधव तिडके, बालाजी पट्टेवाड गजानन कंठाळे, शेषेराव वाकोडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल आहे, अशा विविध उपक्रमाने आगळीवेगळी शिवजयंती भागवत देवसरकर मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी साजरी करण्यात आली आहे. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भागवत देवसरकर मित्रमंडळाचे भगवान कदम,पप्पू पाटील,सुनील पाटील देवसरकर,शेख रहीम,जयवंत पाटील,आकाश कवडे,अविनाश कदम,अनिल देवसरकर, अविनाश देवसरकर,ओमा देवसरकर, मेघराज ससाने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी