शिक्षणाधिकारी सविता बिरगे आज आकाशवाणीवर -NNL


नांदेड|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यीत इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. त्या संदर्भाने नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून गुरूवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.40 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे.

वंचित घटकातील, दिव्यांग व १ लाख उत्पन्न मर्यादेतील खुल्या प्रवर्गातील पालक आपल्या पाल्यास अलीकडेच मला ऑनलाईन नोंदणी करून लकी ड्रॉ द्वारा इयत्ता  पहिलीत प्रवेशित करू शकतात. या मुलाखतीत नांदेड जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. 

25 टक्के प्रवेश म्हणजे काय, ऑनलाइन फॉर्म  भरणे, प्रवेश ड्राॅ, फार्म भरताना कोणती कागदपत्रे लागतात. नांदेड जिल्ह्यात एकूण किती जागा आहेत. किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी