श्रीनिकेतन शाळेत राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी - NNL


नांदेड|
दिपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सहसचिव डॉ.सौ.एस एन.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजातील अनिष्ट, रूढी परंपरा दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवत, शिक्षणाशिवाय आयुष्य फुकट आहे,आडाणी न राहता शिकून मोठे व्हावे, स्वच्छतेला महत्व द्यावे, प्राणी हत्या करू नये,देव देवळात नाही तर रंजल्या गाजल्या मानसात आहे असा संदेश दिला त्यांचे कार्य  सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ.सौ.राऊत यांनी अध्यक्षीय समारोपात करून गाडगेबाबा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या‌.

कार्यक्रमात विद्यार्थी सुदाम वाघमारे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या वेशभूषत हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगितले तर यावेळी शिक्षक प्रल्हाद आयनेले,श्रीधर पवार,अविनाश इंगोले, मगरे सौ.सुरेखा मरशिवणे, विद्यार्थीनी अनुष्का कांबळे, श्वेता पाईकराव यांनी  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार राठोड यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी