महाशिवराञी निम्मित अंखड हरिनाम सप्ताहास आजपासुन सुरवात-NNL

मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील जाहुर येथे महाशिवराञी निमित्त अंखड हरिनाम सप्ताह दि.23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे.

दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती,सकाळी ८ ते १० शिवलीलाअमृत पारायण  ,सकाळी ११ ते १ गाथाभजन दुपारी ३ ते ६ रामायण,सांयकाळी ६ ते ७ हरीपाठ ,राञी ९ ते ११ किर्तन  राञी ११ ते ४ हरीजागर होणार आहे.

आज दि.२३ फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.गंगाधर महाराज वसुरकर ,२४ फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोळेकर,२५ फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज काकडे,२६ फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.माऊली महाराज जाहुरकर ( बालकिर्तनकार   ),२७ फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प. कालीदास महाराज पाळेकर,२८ फेब्रुवारी रोजी भगवान महाराज महालिंगीकर ,१ मार्च रोजी  श्री.ह.भ.प. मनोहर महाराज आंळदीकर , यांचे किर्तन होणार आहे. 

१ मार्च रोजी राञी अग्निकुंड होईल. २ मार्च रोजी मनोहर महाराज वसुरकर  यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते  १२ या वेळेत होणार आहे व तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचा सामना होणार आहे.या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन जाहुर येथील गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी