हिमायतनगर। तालुक्यात अनेक दिवसा पासुन चोरी, लुटमार, दरोडे, खून, व हापमर्डर सारख्या घटना घडत आहेत. भर दिवसा खुनाचे प्रकार सुरू असल्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीला कार्ला गावानजीक शेतीच्या आखाडयावरून सोयाबीन, कापूस चोरी गेल्याचा घटनेनंतर शेतकरी हैराण झाले आहेत.
ग्रामीण भागात चोरटे दिवसभर शेतीच्या आखाड्यावर नजर ठेऊन रात्रीला कापुस, सोयाबीन, तुर, या पिकाची चोरी करून चोरटे पसार होत असतांना दिसत आहेत. काल रात्री १० वाजताच्या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील कारला शिवारात मोठी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा डाव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष डाॅ. अब्दुल गफार यांनी उधळून लावला.
शेतकरी गोविंदराव सुरोशे, बाबुराव राहुलवाड, शे, शब्बीर, तसेच मुकुंदराव सुरोशे यांच्या शेतातील शेडचे कुलुप तोडुन मोठी चोरी करण्याचा डाव रचला आसता रात्री विक्रम सुरोशे हे जागलीसाठी आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ डाॅ. गफार साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व झालेल्या घटनेची माहिती दिली. तंटामुक्ती अध्यक्षानीं हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेबांना फोन करून माहीती दिली व शेतकर्याला तातडीची उपाययोजना देण्यात यावी अशी विनंती केली.
त्यामुळे पो. कोंस्टेबल हेंन्द्रे यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पण अंदाजे 40,000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कापुस, सोयाबीन सोडुन चोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मोठ्या चोरीचा डाव उधळून लावण्यात पोलीसांना यश आले. यावेळी डाॅ. गफार (तंटामुक्ती अध्यक्ष), जावेद शेठ, आनसार भाई, संजय मोरे, सुनिल चव्हाण, शाम चव्हाण, गजानन मिराशे ( ग्रा. पं. सदस्य) शंकर गुंडेवार, नजीर शेठ, ओमप्रकाश मोरे, आदींसह पोलिस प्रशासन व इतरांचं गावकऱ्यांनी आभार मानले आहे.