नांदेड| श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय राणीसावरगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजामाता व मावळ्यांची वेशभूषा केली.
यात शाळेचा विद्यार्थी विश्वजीत कदम व अथर्व कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर श्रावणी घाळगीर ,ऋषींका धापसे, भक्ती शिवसांब कोरे,आरुषी अशोक भिकाणे,सिद्धी धुळे,श्रीशा मंगलगे, रिद्धी गाडे यांनी जिजामाता यांची वेशभूषा केली, वेशभूषा केलेल्या सर्व विद्यार्थांना घोड्यावर बसून त्याच्या सोबत वेशभूषातील मावळे पथक, झाँज पथक, लेझिम पथक व सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, लेझिम खेळत, प्रसंगी मनोरे करीत, व काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर व गीतावर डान्स करीत मोठया जलोषात सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देनारी रॅली काढण्यात आली, लहान लेकरांची वेशभूषा, शिस्त, घोषणा, मनोरे, लेझिम, व डान्स पाहुण सर्व गावकरी शाळेचे व मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिकच्या मुख्याध्यपिका जयश्री स्वामी , उच्च प्राथमिक चे मुख्याध्यापक व्यँकट कदम , प्रायमरीचे शेविंयार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक परमेश्वर क्षीरसागर व वर्षा मेकाले व वैजेनाथ आडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतावर व पोवाड्यावर मनोरे व डान्स बसवला व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याना सहकार्य करीत मेहनत घेतली. सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रॅली काढल्यानंतर शेवटी सर्व विद्यार्थी शाळेत येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक कदम सरांनी मनोगत मांडताना सांगितले की,आपल्या जीवनात जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो तो व्यक्ती समाजात मान सन्मान प्राप्त करतो म्हणून या मानव जन्मातील चांगले व्यक्तिमत्व म्हणून जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे मत मांडले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मदा मंगलगे यांनी केले व विठ्ठल फड यांनी आभार व्यक्त करताना विद्यार्थाचे आत्मबल वाढण्यासाठी कोणतीही शुल्क न घेता दरवर्षी शाळेला विठ्ठल राठोड मामा व पिंटू मामा घोडे देतात.त्याचें मनापासून सम्पूर्ण शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे गौरवउदगार काढले. व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.