नांदेड| येथील श्रध्दा चंद्रकांत देशमुख यांना त्यांच्या शिक्षण व संगीत क्षेत्रातील सक्रीय योगदानाबद्दल जिजाऊ, सावित्री रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
जिजाऊ, सावित्री जयंतीनिमित्त आझाद ग्रुप व युवाराज्यच्या संयुक्त विद्यमाने गौरव जिजाऊ, सावित्री लेकींचा या विषयावर लेखमाला मागविण्यात आली होती. श्रध्दा देशमुख यांनी त्यात उत्कृष्ट लेख लिहून पुरस्कार पात्र ठरल्या आहेत.
नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.जयश्री पावडे, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई कदम, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, डॉ.हंसराज वैद्य आदींच्या हस्ते श्रध्दा देशमुखला जिजाऊ, सावित्री रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. शहरातील गणराज पॅलेस येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास आझाद ग्रुपचे अध्यक्ष भीमा शंकर कापसे, प्रा.गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती.