हिमायतनगर| कर्नाटक राज्यातील काही जिहादी व विषारी मानसिकतेने पछाडलेल्या समाज कंटकांनी हर्ष नामक बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घुर्ण हत्या केली. त्या हत्येचा हिमायतनगर येथे निषेध करण्यात आला असून, याबाबतचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हर्ष नामक बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घुर्ण हत्या हि कर्नाटक राज्यातील विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरले गेले त्याचा हा दुष्परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पापुलर फ्रंट ऑफ इंडिया, कैम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केले आहे. त्यामुळेच बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, यापूर्वी भारतात घडविलेल्या १९४६ च्या डायरेक्त्त चळवळीशी साधर्म्य असलेल्या मानसिकतेवर कायद्याने कठोर कार्यवाही करावी व आरोपीस जरब बसावी अशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद मागणी करत आहे.
सिमीचेच दुसरे रूप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कैम्प फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रॉटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर बंदी घालावी. आणि त्यांना पायबंद करावे अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायदयाचे काम करेलच पारानातू याना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करून सुधारावे हि अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कैम्प फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रॉटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेली आहेत. त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वाढोणा शाखाचे गजानन चायल आदींसह येथील शेकडो युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.