नवीन नांदेड। वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अडचणी दूर करून समाजाला एकसंघ करण्यासाठी ज्यांनी आपले संपुर्ण जिवन समाजासाठी अर्पण केले. तसेच
परमरहस्य पारायण, शिवनाम सप्ताह, पदयात्रा, दिंडी, सत्संग, ग्रंथ प्रकाशन अशा विविध कार्यातून समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे प.पु.राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची १०५वी जयंती आज दिनांक २५.०२. २०२२ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम प.पु.राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, प्रल्हाद गव्हाणे, भि. ना. गायकवाड, नामदेव पदमने, विठ्ठल वाळके, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, संतोष कांचनगिरे, संगम कांचनगिरे, दिगंबर कदम, सौ. सुमन पवार, शशिकांत हाटकर, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.