मोफत होमिओपॅथी उपचार शिबीर
नांदेड। डॉ.संतोषकुमार स्वामी यांचे अरोग्य संपदा होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी क्लिनीक,हनुमानपेठ येथे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या १०६ व्या जन्मोत्सवा निमित्त मोफत होमिओपॅथी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराची सुरवात राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केदार नागठाणे,समता बँक व्यवस्थापक,वैजनाथ स्वामी,राष्ट्रिय सचिव प्रवक्ता अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ तथा कार्यकारी संपादक दैनिक लोकराज्य,साईवंदन क्लिनीकचे डॉ.सुनंद लोया,कैलाश पाटील,नारायण हळदे, गुप्ताजी, डॉ. संतोषकुमार स्वामी हे राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे परमभक्त आहेत. अप्पाजींच्या सहवासात अनेक वर्षापासून मोफत रूग्णसेवा केली आहे.
नांदेड येथे झालेल्या राष्ट्रिय शिवनाम सप्ताहात हजारो रूग्णांना मोफथ उपचार करून विनामुल्य औषधी वाटप करण्यात आली होती.आज अप्पाजींच्या १०६ व्या जन्मोत्सवा निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करून अप्पाजींना आदरांजली अर्पन केली.