लोहा| लोह्याचे भूमिपुत्र व वनविभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक गोविंदराव बिडवई यांच्या स्नुषा प्रांजली प्रसादराव बिडवई यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅंन होजे स्टेट यूनिवर्सिटी मधून एम.एस. ( सॉफ्टवेअर इंजीनीरिंग ) ही उच्च-पदवी विशेष प्रविण्यासह प्राप्त केली आहे. त्यांना या देशातील नामांकित आय टी कंपनीने नौकरी दिली आहे. या भूमीतल्या लेकीने साता समुद्रा पार आपल्या यशाचा पातका फडकविला आहे
सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी गोविंदराव बिडवई व सौ जयश्री गोविंदराव बिडवई यांचे चिरंजीव प्रसाद बिडवई यांनी पुणे विद्यापीठातून बी.ई. ( कम्प्युटर इंजीनीरिंग ) केले असून, त्यांनी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून या पूर्वीच एम.एस. (सॉफ्टवेअर इंजीनीरिंग) ची उच्च-पदवी प्राप्त केलेली आहे. ते गेल्या सहा वर्षापासून अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून कार्यरत आहेत.
गोविंदराव यांच्या स्नुषा यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटी मधून त्यांनी एम.एस. उच्च-पदवी प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेतील (H.P.)या नामांकित कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर या पदावर नुकतीच निवड झालेली आहे. सौ. प्रांजली प्रसाद बिडवई यांनी नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंघजी कॉलेज ऑफ इंजीनीरिंग मधून बी.टेक. पर्यन्त शिक्षण घेतले आहे
सौ. प्रांजली बिडवई या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व विठ्ठलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केरबा बिडवई यांच्या सुनबाई असून त्या नांदेड येथील कोडगिरे परिवारातील सुकन्या असून श्री. सुरेशराव कोडगिरे यांच्या पुतणी आहेत. गोविंदराव बिडवई यांचा परिवार उच-विद्याविभूषित असून त्यांची मोठी कन्या सौ. आरती ही एम.एस.सी. (सॉफ्टवेअर इंजीनीरिंग) केलेली आहे, त्यांचे मोठे जावाई डॉ.सचिन नून्नेवार हे अमेरिकेमध्ये बालरोगतज्ञ आहेत. छोटी कन्या सौ. पूजा ही एम.ई.(इलेक्ट्रॉनिक्स) असून, छोटे जावाई श्री.रोहण शिरपेवार यांनी एम.एस.(केमिकल इंजीनीरिंग)केलेले आहे ते औरंगाबाद येथील उद्योजक आहेत.
गोविंदराव बिडवई यांनी वनस्पति शास्त्रात एम.एस.सी. केलेले असून, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागतून उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. सौ प्रांजली प्रसाद बिडवई यांच्या यशाबद्दल मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.लोह्याच्या भूमीला याचा अभिमान वाटतो आहे.