माता रमाई गणगोत पुरस्काराचे थाटात वितरण -NNL

माता रमाई विचार मंच व  प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा  नाविन्यपूर्ण उपक्रम


नांदेड|
माता रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सन २०२२ या वर्षीचे माता रमाई गणगोत पुरस्काराचे मोठया थाटात  वितरण करण्यात आले असून, त्यात आयु. रत्नमाला गौतम भावे, आयु. तारामती वीरेंद्र आऊलवार, आयु. मायाबाई  अशोक ना.गोडबोले ,आयु. रोहिणी  मिलिंद एंगडे, आयु. सूर्यकांता दत्ताहरी धोत्रे, आयु. कांताबाई  प्रकाश  मस्के , आयु. सोनाबाई गोविंदराव सोनकांबळे आणि आयु. मायाबाई अशोक मा.गोडबोले याना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय व प्रेरणादायी जीवनाचा आदर्श घेऊन, आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या आदर्श माता, पत्नी, कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी जवळा देशमुख येथे माता रमाई गणगोत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे पुरस्काराचे  तिसरे वर्ष असून, यावर्षी माघ  पौर्णिमा व १२४ व्या रमाई जयंतीनिमित्त पौर्णिमोत्सव आणि धम्मदेसना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो आणि श्रामणेर भिक्खू संघ, भंते धम्मपाल, समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, विपश्यनाचार्य गौतम भावे, माजी मनपा उपायुक्त प्रकाश येवले, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राज गोडबोले, डॉ. चंद्रशेखर एंगडे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, माजी सरपंच कैलास गोडबोले, माजी उपसरपंच पुरभाजी गोडबोले, आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवळा येथील रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या रुक्मिणीबाई गोडबोले, गिरजाबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोले, वैशाली गोडबोले, संगिता गोडबोले, मिनाक्षी गोडबोले, आकांक्षा गोडबोले, प्रियंका गोडबोले, छाया गोडबोले, विद्या गोडबोले, शितल गोडबोले, पांडूरंग गोडबोले, रावण गोडबोले, पुरभाजी गोडबोले, रमेश गोडबोले, कैलास गोडबोले, विलास गोडबोले, आनंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, विनोद गोडबोले, वैभव गोडबोले, विशाल गोडबोले, मिलिंद बाबुराव गोडबोले, विकास गोडबोले, रोहिदास गोडबोले, भय्यासाहेब गोडबोले, मारोती चक्रधर,   यांनी परिश्रम घेतले.         

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी